पन्हाळा – ऊस तुटलेल्या रानात सध्या मशागती सुरू झाल्या असून या रानात पुन्हा उसासाठी सरी सोडणे व भाजीपाला करण्यासाठी बळीराजाची लगबग सुरू झाली आहे.तर सध्या शेतीच्या कामात बळीराजा च कुटुंब मग्न झालेले दिसत आहे.
पन्हाळा पश्चिम व शाहुवाडी पूर्व भागात ऊस तुटलेल्या शेतात मशागत करून पुन्हा त्या रानात नवीन पीक घेण्यासाठी शेतकऱ्याची धांदल उसळली आहे. सध्या मशागत करून तयार केलेल्या शेतात कलिंगड, सूर्यफूल, भुईमूंग आदी पिकाच्या पेरणीसाठी शेतकरी रानाच्या मशागतीत गुंतला आहे. सध्या शेतात जत्रेचे स्वरूप पाहावयास मिळत आहे.
काही शेतकरी बैलांच्या साह्याने तर काही ट्रॅक्टर च्या सहाय्याने मशागत करण्यासाठी मग्न आहेत.सध्या उत्तरे, वाघवे ,पिंपळे, आळवे ,गोलीवडे, कोतोली, कोलोली, कनेरी ,करंजफेन, तेलवे,तिरपण, माळवाडी, आदी भागात शेती कामांना वेग आल्याचे दिसत आहे.