हातकणंगले :- डॉ.डी.वाय.पाटील कृषी महाविद्यालयाच्या कृषीकन्यांनी जुने पारगाव येथे शेती विषयक युट्यूब व्हिडिओ कसे बनवावे व ते कसे अपलोड करावे आणि आपली शेतीविषयक महत्वाची माहिती इतर शेतकऱ्यांसोबत कशी पोहचवावी हे सांगितले.
याचा सगळ्या शेतकऱ्यांना खूप फायदा आहे आणि यामुळे आपण आपला शेती व्यवसाय आणखी प्रगतशील बनवू शकतो हे सांगितले.
कृषीकन्या वेदिका देसाई,समृद्धी पाटील,लतिका कांबळे,सृष्टी गुंडणके,पल्लवी भिंगे,सानिका धुमाळ,स्नेहल जाधव यांनी ही माहिती सांगितली.या प्रात्याक्षिकासाठी प्राचार्य डी.एन.शेलार सर, अकॅडमीक इन्चार्ज आर.आर.पाटील सर, डॉ.एस.एम.घोलपे सर, प्रा.व्ही.एम.गवळी मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.