अणुस्कुरा घाटात एस टी बसचे ब्रेक निकामी; चालकाच्या हुशारी मुळे वाचले 50 प्रवाशांचे प्राण

शाहुवाडी :सांगलीहून राजापूरच्या दिशेने जाणाऱ्या बसला  आज सोमवार दिनांक 13 रोजी सकाळी १० वाजण्याचा सुमारास गाडी अणुस्कुरा घाटातून जात असताना  ब्रेक निकामी झाल्यामुळे अपघात झाला. मात्र यावेळी  एस टी .चालक एस. आर कुर्णे यांनी प्रसंगावधान राखत गाडी डोंगराच्या कडेणे घासल्याने मोठा अनर्थ टळला.

त्यांच्या खबरदारीमुळे ५० प्रवाशांचा जीव वाचला. अन्यथा गाडी दरीत कोसळून मोठी जीवितहानी झाली असती.
चालक कुर्णे यांच्या धाडसाचे सर्व स्थरातून कौतूक होत आहे”