पन्हाळा – कोतोली सारख्या ग्रामीण भागामध्ये यू.पी.एस.सी.व एम.पी.एस.सी.ची तयारी करण्यासाठी महाविद्यालयामध्ये स्पर्धा परीक्षा केंद्र व करिअर कट्टा यांच्यामार्फत यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ऑनलाइन व ऑफलाइन मार्गदर्शन देण्यात येत आहे त्याचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा व आपले भविष्य उज्वल करावे असे प्रतिपादन दिल्ली विद्यापीठातील योगेश्वर पाटील यांनी केले.
श्रीपतराव चौगुले कॉलेज,माळवाडी-कोतोली येथील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष, स्पर्धा परीक्षा व करिअर कट्टा व ज्ञानज्योती अभ्यासिका कोतोली यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धा परीक्षेची तयारी या विषयावर आयोजित केलेल्या व्याख्यान प्रसंगी मार्गदर्शन करताना योगेश्वर पाटील बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.विजयकुमार पाटील होते.कार्यक्रमास प्रमुख उपस्थित म्हणून ऍक्टिव्हिटी प्रमुख डॉ.एस.एस. कुरलीकर होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत डॉ.एन.डी.मांगोरे यांनी केले आभार डॉ.एस.एस.कुरलीकर यांनी मानले.कार्यक्रमास सर्व शिक्षक,कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. श्रीपतराव चौगुले कॉलेजमध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी या विषयावर मार्गदर्शन करताना योगेश्वर पाटील सोबत डॉ.एन.डी. मांगोरे,डॉ.विजयकुमार पाटील,डॉ. एस.एस.कुरलीकर