कोल्हापूर: सकल जैन मारवाडी समाज तर्फे आयोजित एएवायएम जेपीएल डे-नाईट क्रिकेट मॅच या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आमदार राहुल आवाडे यांच्या उपस्थितीत नामदेव भवन, कागवाडे मळा, इचलकरंजी येथे पार पडला.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आ.राहुल आवाडे उपस्थित होते. उद्घाटन करताना त्यांनी खेळाडूंना यशस्वी भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आणि आरोग्यदायी जीवनशैली व सांघिक भावना जोपासण्याचा संदेश दिला.
कार्यक्रमाला समाजातील मान्यवर, आयोजक मंडळ, खेळाडू आणि प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या स्पर्धेचा मुख्य उद्देश म्हणजे खेळाडूंमध्ये स्पर्धात्मकता व मैत्रीभावना जोपासणे, तसेच समाजात एकात्मता आणि बंधुभाव निर्माण करणे हा होता.
“या उपक्रमामुळे समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल आणि युवकांना प्रेरणा मिळेल,” असे गौरवोद्गार आमदार राहुल आवाडे यांनी काढले.