शौमिका महाडिक यांच्या हस्ते शिरोली येथे नाभिक समाजाच्या सभागृह बांधकामाचा पायाभरणी शुभारंभ

कुंभोज (विनोद शिंगे)

पुलाची शिरोली ग्रामपंचायतीच्या वतीने नाभिक समाजासाठी सामाजिक सभागृह उभारण्यात येत आहे. या सभागृहाचे भूमिपूजन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शौमीका महाडिक हस्ते करण्यात आले आहे.

 

समाजातील प्रत्येक घटकाला सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी कटिबद्ध असून विकासाची गंगा तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा मानस यावेळी व्यक्त केला.

यावेळी लोकनियुक्त सरपंच पद्‌मजा करपे, उपसरपंच बाजीराव पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य सुजाता पाटील, महादेव सुतार, विजय जाधव, श्रीकांत कांबळे, मनिषा संकपाळ, कमल कौदाडे, महमद महात, वसिफा पटेल,कोमल समुद्रे, अनिता शिंदे, हर्षदा यादव, अरिफ सर्जखान, धनश्री खवरे, नाजिया देसाई, अविनाश कोळी, दिलीप पाटील, अनिल शिरोळे, उदय पाटील, सतिश पाटील, दिपक यादव, संपत संकपाळ, शिवाजी समुद्रे, सुभाष पाटील, सलिम महात, राजेश पाटील, बबन संकपाळ, ग्रामविकास अधिकारी गिता कोळी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.