सरस प्रदर्शनातील टाकाऊ वस्तुपासून टिकावु वस्तूंचा स्टॉल ठरला लक्षवेधी

कोल्हापूर : स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गंत स्वच्छता ही सेवा 2024 अंतर्गत  दिनांक 15 सप्टेंबर 2024 ते दिनांक 2 ऑक्टोंबर 2024 या कालावधीत ग्रामपंचायत स्तरावर स्वच्छतेचे विविध उपक्रम राबविणेत आले होते. या उपक्रमांबरोबर प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन. एस., जिल्हा परिषद कोल्हापूर यांनी शालेय विद्यार्थांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी, वापरात नसलेल्या टाकावु वस्तु पासुन, विद्यार्थांनी नाविण्यपुर्ण कल्पकतेतुन टिकावु वस्तुंची निर्मिती करावी या उद्देशांने जिल्हयातील सर्व शाळांमध्ये टाकाऊ वस्तु, पासुन टिकावु वस्तुंची निर्मिती ( वेस्ट टु आर्ट ) हा विशेष उपक्रम जिल्हयातील सर्व शाळांमध्ये राबविणेत आला.  या उपक्रमांतर्गत प्रत्येक तालुक्यातील उत्कृष्ट 5 वस्तु चे जिल्हा स्तरावर कार्यालयामध्ये प्रदर्शनीसाठी ठेवणे बाबत निश्चित केले होते.
विद्यार्थ्यांनी टाकाऊ वस्तु पासुन बनविलेल्या टिकावु वस्तूंचे प्रदर्शन भरविणेसाठी, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांचे मार्फत दिनांक 6 ते 10 जानेवारी 2025 या कालावधीत जिल्हा स्तरावर भरविणेत आलेल्या मिनी सरस या स्वयंसहाय्यता समुहांच्या उन्पादन्नांचे विक्री प्रदर्शना मध्ये जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष जिल्हा परिषद कोल्हापूर विभागाचा स्टॉल उभारणेत आला आहे.
 या स्टॉल मध्ये शालेय विद्यार्थांनी बनविलेल्या  टाकाऊ वस्तू, पासुन टिकावु उत्कृष्ट वस्तुचे प्रदर्शन भरविणेत आले आहे. विद्यार्थ्यांनी घरातील व परिसरातील टाकावु वस्तु पासुन विविध प्रकारच्या टिकावु वस्तु बनविल्या आहेत. यामध्ये प्लास्टीक बाटली पासुन विविध प्रकारच्या फुलदानी, पेन स्टँन्ड, तुळस कट्टा, झुंबर, ब्रिक्स स्टुल बनविले आहे. कागद व पुटया पासुन श्री राम मंदीर कलाकृती, बैलगाडी, जहाज, ग्रामीण महिलांची बाहुली, टेबल वरील शोकेस, आकाश कंदील, झुंबर, दाराचे तोरण, भिंतीवरील शोपिस, नाराळा पासुन तयार केलेले तबला, घर, पाण्याचा जार, बास्केट, अंडयांच्या कवची पासुन बनविलेले वांगे, लोखंडी डब्यापासुन बनविलेले पक्षांसाठी घरटे या आकर्षक वस्तुचा समावेश आहे. स्टॉल मधील विविध प्रकारच्या वस्तु पाहुन नागरीक, विद्यार्थ्यांचे कौतुक करीत आहेत.
टाकाऊ वस्तू, पासुन टिकावु वस्तू हा उपक्रम प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन. एस., जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविणेत आला असुन, या उपक्रमाचे सनियंत्रण जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष व शिक्षण विभाग जिल्हा परिषद, कोल्हापूर यांनी केले .
🤙 9921334545