कुंभोज (विनोद शिंगे)
आमदार डॉ विनयरावजी कोरे व हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार दलितमित्र डॉ अशोक माने यांच्या विशेष प्रयत्नातून ग्रामविकास विभागाच्या 2515, ग्रामीण सुविधा,जनसुविधा व नागरीसुविधा योजनेअंतर्गत खोची या गावच्या विकास कामांसाठी 5 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता.
या विकास कामांचा लोकार्पण सोहळा हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे नूतन आमदार दलितमित्र डॉ अशोकराव माने यांच्या शुभहस्ते व लोकनियुक्त सरपंच सौ रोहिणी पाटील अध्यक्षतेखाली
व संचालक वारणा दूध संघ दिपक पाटील,माजी पं स सदस्य वसंतराव गुरव आबा,भाजपा हातकणंगले तालुकाध्यक्ष अमरसिंह पाटील,माजी उपसरपंच सुहास गुरव यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी बी के चव्हाण, ग्रामसेवा मगदूम सर, तलाठी प्रमोद पाटील, रणजीत पाटील, कोळी सर, माळी सर,ग्रा.प सदस्य प्रमोद सूर्यवंशी,ग्रा.प सदस्य जगदीश पाटील,ग्रा.प सदस्य प्रमोद गुरव,ग्रा.प सदस्य अभिजीत चव्हाण,ग्रा.प सदस्या सौ. पूनम गुरव, दीपक पाटील,पोपट गुरव, गणपती शिंदे, एम के दादा,महेश पाटील,दादासो पाटील,दिलीप पाटील,महावीर मडके, अरविंद बाबर,धनाजी गुरव,जालिंदर पाटील, आनंदराव पाटील यांसह गावातील प्रतिष्ठित नागरिक,महिला भगिनी, बंधू व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते..