पट्टणकोडोली येथे तात्काळ पोलीस चौकी स्थापन करावी-शिवाजी जाधव

कुंभोज ( विनोद शिंगे)
पट्टणकोडोली गावातील कायदा सुव्यवस्था अबाधित राखणेसाठी हुपरी पोलीस ठाणे हदित पोलीस चौकी पट्टणकोडोली येथे तात्काळ स्थापन करावी या मागणीसाठी युवासेना अध्यक्ष शिवाजी जाधव यांनी शिष्टमंडळासह हुपरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री.चौखंडे यांची भेट घेतली.

 

सदरच्या मागणीनुसार पुरेश्या मनुष्यबळासह लवकरात लवकर पट्टणकोडोली येथे पोलीस चौकीची उभारणी करण्यासाठी पोलिस प्रशासन सकारात्मक असल्याचा शब्द श्री.चौखंडे यांनी युवासेनेच्या शिष्टमंडळाला दिला. प्रस्तावित पोलीस चौकीच्या जागेबाबत रयत क्रांतीचे तालुकाध्यक्ष विजय उर्फ गुंडूराव मोरे यांनी पोलीस प्रशासनाला माहिती अवगत केली.

यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख विजयकुमार स्वामी,शाहू सोसायटीचे चेअरमन प्रकाश जाधव,विठ्ठल रामण्णा,सतीश हुपरे,संदीप तोडकर,युवासेना विभागप्रमुख विनायक तोडकर,निलेश चव्हाण,युवासेना शहरप्रमुख अमोल केरू,दशरथ तोडकर,विशाल तोडकर यांच्यासह युवासेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.