आ.राहुल आवाडे यांच्या उपस्थितीत इचलकरंजी, हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील कामांची आढावा बैठक

कुंभोज (विनोद शिंगे)

जिल्हा परिषद, कोल्हापूर येथे हातकणंगले तालुका व इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील विविध कामांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीस आमदार डॉ. राहुल प्रकाश आवाडे उपस्थित होते.

 

 

आमदार डॉ. राहुल प्रकाश आवाडे यांनी नागरिकांच्या समस्यांवर तत्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. तसेच सर्व संबंधित विभागांनी समन्वय साधून प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यावर भर देण्याचे सांगितले.

बैठकीस जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी श्री कार्तिकेयन एस कार्यकारी अधिकारी , डेपोटी सिओ सौ सुषमा देसाई, डे सिओ जोशी साहेब, मुख्य कार्यकारी अधिकारी बांधकाम सांगावकर साहेब, उप मुख्य कार्यकारी अधिकारी आरुण जाधव, सरपंच राजू मगदूम, माजी पंचायत समितीचे सभापती महेश पाटील, व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.