कुंभोज (विनोद शिंगे)
कासारवाडी हायस्कूल व ज्युनि. कॉलेज कासारवाडी (ता.हातकणंगले) यांच्या वतीने वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ 2025 आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाचा उद्घाटन समारंभ व पारितोषिक वितरण कार्यक्रम हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार दलितमित्र डॉ अशोकराव माने (बापू ) यांच्या हस्ते व संस्था उपाध्यक्ष विवेक तोडकर सर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.यावेळी लोकनियुक्त सरपंच अच्युत खोत,भाजपा हातकणंगले तालुकाध्यक्ष अमरसिंह पाटील,उपसरपंच विलास खोत, संचालक ज्ञानदीप शिक्षण संस्था नेताजी चेचरे सर,मुख्याध्यापक शिवाजी घाडगे सर,सचिव ज्ञानदीप शिक्षण संस्था विनय तोडकर,शाळा व्यवस्थापक अध्यक्ष नंदकुमार खाडे,जिमखाना विभाग प्रमुख विजय डोंबाळे सर, संस्कृती विभाग प्रमुख सौ. आचार्य श्रीराम गुरुकुलम विशाल निकम, ग्रा.प सदस्या सौ. निशाली पोवार, ग्रा.प सदस्या सुप्रिया वडिंगेकर,ग्रा.प सदस्या सौ. लता निकम,ग्रा.प सदस्या सौ मनीषा लुगडे ग्रा.प सदस्या सौ. तेजस्विनी घाडगे, ग्रा.प. सदस्य अभयसिंह माने,ग्रा.प सदस्य रवींद्र वाघवे, यांसह विद्यार्थी- विध्यार्थीनी,पालक,
ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते,