जागतिक हिन्दी दिवसानिमित्त उद्या विविध कार्यक्रम

कोल्हापूर- जागतिक हिंदी दिवसनिमित्त शिवाजी विद्यापीठातील निलांबरी सभागृहात उद्या, शुक्रवारी (दि. १०) व्याख्यानमाला व आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही माहिती हिंदी विभाग प्रमुख डॉ. तृप्ती करेकट्टी व पर्यावरणशास्त्र प्रमुख डॉ. आसावरी जाधव यांनी दिली.
शिवाजी विद्यापीठातील हिंदी-पर्यावरण अधिविभाग, शिव सहाय्यता व आपत्ती व्यवस्थापन केंद्र आणि युको बॅकेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व्याख्यानमालेत प्रमुख वक्ता म्हणून व्हाईट आर्मीचे संस्थापक अध्यक्ष अशोक रोकडे मार्गदर्शन करणार आहेत. अध्यक्षस्थानी प्र. कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील आहेत. याप्रसंगी निबंध स्पर्धेतील विजेत्यांच्या गौरव व राजभाषा सम्मान पुरस्कार वितरण होणार आहे. दूस-या सत्रात डॉ. पल्लवी कुलकर्णी, डॉ. प्रदीप भिंगार्डे यांचे आरोग्यविषयक मार्गदर्शन, तर दस्तगीर मुल्ला यांचे आगीपासून सुरक्षेवर प्रात्यक्षिक दाखविणार आहेत.
🤙 9921334545