कोल्हापूर: गोकुळ शिरगाव मधील इयत्ता नववी शिकणाऱ्या साची शितल सुतार या विद्यार्थिनीने तिच्या केरळ प्रवासावर आधारित ‘माझा केरळ प्रवास’हे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकाचे प्रकाशन शौमीका महाडिक यांच्या हस्ते करण्यात आले.
साचीने आपले काका वसंत सुतार यांच्या सहाय्याने लिहिलेल्या या पुस्तकात केरळ प्रवासादरम्यान तिला आलेले अनुभव कथन केले आहेत. शालेय वयातच साची मधील लेखिका आकार घेत आहे याचा मनस्वी आनंद वाटतो. असे मत शौमिका महाडिक यांनी व्यक्त केले.
या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला वसंत सुतार, जयसिंगराव घाटगे हायस्कूलचे संस्थापक अध्यक्ष एम एस पाटील,मुख्याध्यापक एस एस जाधव, करवीर पंचायत समितीच्या शिक्षण विस्तार अधिकारी सुजाता गायकवाड,बापूसो पाटील, गोकुळ शिरगावच्या उपसरपंच नूतन पाटील, राजन पाटील,शामराव पाटील, संतोष गवळी, संगीता पाटील, अर्जुन पाटील, के के पाटील, रावसाहेब पाटील, बाळासाहेब डावरे, उदय पाटील, विष्णू पाटील, सागर पाटील, महेश यमगेकर, अनिकेत गुरव, करण पाटील, प्रकाश सातपुते यांच्यासह अन्य मान्यवर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.