कोल्हापूर:गडमुडशिंगी गावातील शेतकऱ्यांची जमीन उजळाईवाडी विमानतळ विस्तारीकरणासाठी भूसंपादन करण्यात आली आहे. परंतु या जमिनीचा शेतकऱ्यांना अद्याप मोबदला न मिळाल्याने येथील शेतकरी आक्रमक झाले आहेत.
झालेल्या ग्रामपंचायतीमधील बैठकीत आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे एकच गोंधळ निर्माण झाला. घटनास्थळी गांधीनगर पोलीस दाखल झाले आहेत.