मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘नशामुक्त नवी मुंबई अभियाना’चा प्रारंभ

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘नशामुक्त नवी मुंबई अभियाना’चा प्रारंभ  नवी मुंबई येथे झाला.

 

 

भारत विकसित राष्ट्र होत असताना देशाला आतून पोखरण्यासाठी अंमली पदार्थांच्या माध्यमातून ड्रग्सचा विळखा देशाभोवती विणण्याचे काम सुरू असल्याचे याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संगितले. म्हणूनच गृह विभागाच्या पहिल्याच बैठकीत ड्रग्सविरुद्ध लढाईचे महत्त्व स्पष्ट केले असल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

ड्रग्सविरुद्ध लढाई लढण्याच्या दृष्टीने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सर्व राज्यांच्या गृहमंत्र्यांची बैठक घेत भारत ही लढाई जिंकू शकतो हा विश्वास व्यक्त केला. देश ड्रग्स मुक्त करण्यासाठी राज्याराज्यांमध्ये समन्वय असणे गरजेचे आहे हे देखील त्यांनी यावेळी अधोरेखित केले. नशा करणे ‘कूल’ नाही हे तरुणाईच्या मनात बिंबवणे गरजेचे असल्याचे सांगत निर्धार आणि मनाच्या शक्तीचे महत्त्व यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

ड्रग्सचे व्यवहार हे मोठ्या प्रमाणावर समाजमाध्यमांतून तसेच कुरिअरमार्फत होत असल्याने हे युद्ध छुपे युद्ध आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध लढा देण्यासाठी 8828-112-112 हा टोल फ्री क्रमांक देण्यात आला आहे. ड्रग्सच्या व्यवहारांची माहिती देऊन आपण या लढाईचे सैनिक होऊ शकतो, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले. तसेच ड्रग्सविरुद्धच्या लढाईची घोषणा केल्यानंतर नवी मुंबई पोलिसांनी सर्वात आधी हे अभियान हाती घेतल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन केले.

यावेळी मंत्री गणेश नाईक, आमदार मंदा म्हात्रे, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, अभिनेते जॉन अब्राहम आणि इतर मान्यवर उपस्थित होते

🤙 9921334545