कोल्हापूर: जिल्ह्यातील रुकडी (ता.हातकणगले) येथील रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शाहू डी.एड.कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राला शैक्षणिक क्षेत्रिय भेट दिली. यामध्ये प्र – संचालक डॉ.कृष्णा पाटील यांनी केंद्राच्या वतीने सुरु असलेल्या विविध अभ्यासक्रमाची माहिती दिली.
यावेळी प्र-संचालक डॉ.पाटील म्हणाले की, दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण
केंद्रामध्ये एकूण १२ अभ्यासक्रम चालविले जातात. शिवाय ऑनलाईन अभ्यास
केंद्रांतर्गत एम.बी.ए. हा अभ्यासक्रम सुरु आहे. या सर्व अभ्यासक्रमांचा
महिला, नोकरदार,कर्मचारी,शेतकरी,विद्यार्थी,बंदीजन,सैनिक यांना तसेच अपूर्ण
शिक्षण पूर्ण करण्याची इच्छा असणाऱ्यांना या अभ्यासक्रमाचा फायदा होणार
आहे.
दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या वतीने विद्यार्थ्यांना स्वयं अध्ययन
साहित्य दिले जाते. त्यांच्यासाठी संपर्क सत्रे, रोजगार मेळावे, सेट / नेट व स्पर्धा
परीक्षेबाबत मार्गदर्शन केले जाते. तसेच दुहेरी पदवीची करण्याची सोय आहे.
सांगली व सातारा या दोन विभागीय जिल्ह्याकेंद्रासह ८६ अभ्यासकेंद्रातर्गत
बी.ए.,बी.कॉम.,एम.ए. (मराठी, हिंदी, इंग्रजी, इतिहास, राज्यशास्त्र, समाजशास्त्र व
अर्थशास्त्र), एम.कॉम., एम.एस्सी.(गणित)., एम.बी.ए. (दूरस्थ व ऑनलाईन
पद्धतीने) सुरु आहेत.याचा लाभ घेता येणार आहे.
तसेच दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राच्यावतीने सुरु असलेल्या ई-कन्टेट
विकसन पद्धतीबाबतची माहिती विद्यार्थ्यांनी संगीत व नाट्य अधिविभागातील
स्टुडीओमध्ये घेतली.सहा.प्राध्यापक डॉ.नितीन रणदिवे यांनी स्वागत केले.यावेळी विद्यार्थ्यांना बी.ए.शिक्षणशास्त्र विषयाची पुस्तके भेट देण्यात आली. यावेळी उपकुलसचिव श्री.व्ही.बी.शिंदे, सहा.कुलसचिव श्री.दिलीप मोहाडीकर,प्रा.डॉ.राम चट्टे ,प्रा.डॉ.कांचन खराटे, प्रा.डॉ.मीनल पाटील, एम.बी.ए.समन्वयक श्रीमती सुप्रिया मोगले व विद्यार्थी उपस्थित होते.