शरद इंजिनिअरिंगमध्ये ‘उद्योजकता जागरुकता’ कार्यशाळा

यड्राव: यड्राव येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथील सिव्हील इंजिनिअरिंग विभागामध्ये शिवाजी विद्यापीठ रिसर्च अॅण्ड डेव्हलेपमेंट फांऊडेशन, इंडो जर्मन टुल रुम यांच्यावतीने दोन दिवशीय उद्योजकता जागरुकता विषयावर कार्यशाळा संपन्न झाली.

 

 

यामध्ये शिवाजी विद्यापीठ, इंटरडिसिप्लिनरी स्टडीजचे प्रमुख डॉ. पी.डी. राऊत, इंडियन कॉमर्स असोसिएशनचे फेलो आणि महाराष्ट्र कॉमर्स असोसिएशनचे फेलो, माजी प्राचार्य डॉ. ए.एम. गुरव यांनी मार्गदर्शन केले. ते असे म्हणाले, आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये प्रत्येकजण नोकरीच्या मागे धावत असताना दिसते. प्रत्येकांचं तांत्रिक शिक्षण घेवून नोकरी मिळविण्यासाठी प्रयत्नशील रोहतो. त्यामुळे मराठी माणूस उद्योजक न होता नोकरदार होत आहे. त्यामुळे मराठी माणसांच्या मनात उद्योजक होण्याचे स्वप्न रपजविण्यासाठी हि कार्यशाळा काम करीत आहे.

कार्यशाळेचे आयोजन सिव्हील विभागातील प्रा. ए.बी. जाधव, प्रा. पी.आर. पाटील यांच्यासह विभागातील प्राध्यापक यांनी केले. यासाठी संस्थेचे एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांचे मार्गदर्शन लाभले. प्राचार्य डॉ. एस. ए. खोत यांचे सहकार्य लाभले.
फोटो ओळ- यड्राव येथे शरद इंजिनिअरिंगमध्ये उद्योजकता जागरुकता विषयावर मार्गदर्शन करताना डॉ. पी.डी. राऊत.

🤙 9921334545