मार्गदर्शन करताना विश्वस्त, विनायक भोसले म्हणाले येणाऱ्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी टेक्नॉलॉजी ट्रान्सफॉरमेशन आणि कमी खर्चात सर्वोत्तम उपाय देऊन समस्येचे निराकरण करणे हे येणाऱ्या भावी अभियंत्यांसाठी मोठे आव्हान आहे. आणि या आव्हानाच्या दिशेने वाटचाल इन्स्टिट्यूटमधील विद्यार्थी करतांना दिसतात. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रकल्पांमधून त्यांची नवकल्पना, सर्जनशीलता आणि तांत्रिक कौशल्य यांचे दर्शन घडले. विद्यार्थ्यांचे आणि त्यांना मार्गदर्शन केलेल्या प्राध्यापकांचे भोसले यांनी कौतुक करून शुभेच्छा दिल्या. या वेळी डॉ. गिरी यांनी नाविन्यपूर्ण दृष्टिकोनाचा आणि विद्यार्थ्यांच्या अथक प्रयत्नांचा एक उत्कृष्ट नमुना म्हणजे प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांकडून पेटंट दाखल करणे हे इन्स्टिट्यूटसाठी खूपच अभिमानास्पद गोष्ट असेही नमूद केले.
कार्यक्रम संजय घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष संजयजी घोडावत, विश्वस्त विनायक भोसले, इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. विराट. व्ही. गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला आहे.