जिल्हाधिकारी कार्यालयात वार्षिक मूल्य दर तक्ता सन २०२५-२६ ठरविण्याबाबत बैठक

कोल्हापूर : आज कोल्हापूर जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधींची बैठक छत्रपती शिवाजी सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस आमदार राहुल आवाडे उपस्थित होते. यावेळी संबंधित अधिकारी देखील उपस्थित होते.

 

स्थावर मिळकतींच्या हस्तांतरणासाठी मुद्रांक शुल्क आकारणीसाठी वार्षिक मूल्य दर तक्त्यांचा वापर केला जातो. सन २०२५-२६ साठी वार्षिक मूल्य दर तक्ता ठरविण्याच्या दृष्टीने प्रारूप प्रस्ताव तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे. या संदर्भात लोकप्रतिनिधींच्या सूचना व अभिप्राय जाणून घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती.

या विषयावर लोकप्रतिनिधींनी मोलाचे अभिप्राय दिले असून, संबंधित सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.