शिवाजी विद्यापीठात गुरुवारी डॉ. सुनीलकुमार लवटे यांचे विशेष व्याख्यान

कोल्हापूर: ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या उपक्रमांतर्गत शिवाजी विद्यापीठात गुरूवारी (दि. ९) सकाळी ११ वाजता ज्येष्ठ विचारवंत व साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू डॉ प्रमोद पाटील असतील. डॉ. विलास शिंदे प्रमुख उपस्थित असतील.
महाराष्ट्र शासनाच्या ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या उपक्रमांतर्गत शिवाजी विद्यापीठात अनेक उपक्रम राबवण्यात येत आहेत. विद्यापीठाचे बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्र आणि ग्रंथालय व माहितीशास्त्र अधिविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने गुरूवारी सकाळी डॉ. लवटे यांचे “वाचनाची विस्तारित क्षितिजे” या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित केले आहे. ग्रंथालयातील व्हर्चुअल क्लासरूम येथे व्याख्यान होईल. तरी, सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी व्याख्यानास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्त्रोत केंद्राचे संचालक डॉ. धनंजय सुतार यांनी केले आहे.