महाराष्ट्रात राबविले जाणार ‘ई – कॅबीनेट’

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या प्रशासनात तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त करण्याकरिता ई-कॅबिनेट प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
राष्ट्रीय माहिती केंद्र (NIC) ने विकसित केलेल्या ‘ई कॅबिनेट’ प्रणालीचे मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी मंत्रिमंडळ बैठकीत सादरीकरण केले.

‘ई कॅबिनेट’ची प्रमुख वैशिष्ट्ये:

✅आयसीटी आधारित या प्रणालीमुळे मोठ्या प्रमाणावर होणारा वापर कमी होणार आहे
✅मंत्रिमंडळ सदस्यांसाठी सुलभ डॅशबोर्ड उपलब्ध होईल त्याचबरोबर संदर्भ शोधणे, कृती बिंदू (ॲक्शन पाईंट) पाहणे, निर्णयांचे पुनरावलोकन करणे सुलभ होईल.
✅ई-कॅबिनेटमुळे मंत्रिमंडळ बैठकांचे, निर्णयांचे व त्यासंबंधीच्या दस्तऐवजांचे जतन होईल.
✅पारंपरिक मंत्रिमंडळ बैठकांमध्ये येणाऱ्या विविध अडचणींवर या प्रणालीमुळे मात करता येईल.
✅मंत्रिमंडळासमोर चर्चा आणि निर्णयासाठी प्रस्ताव सादर आणि अंतिम निर्णय घेणे ही प्रक्रिया सुलभ होईल
✅पारंपरिक बैठकींतील कागदपत्रांच्या वितरणासाठीची धावपळ कमी होईल. अधिकारी-कर्मचाऱ्यांचा आणि मंत्रिमंडळाचा मोठा वेळ वाचेल.