कोल्हापूर महापालिकेने कोल्हापूर शहर सुधारणा समितीच्या आंदोलनाची दखल घेऊन गुन्हा दाखल

कोल्हापूर कोल्हापूर शहर सुधारणा समितीच्या वतीने रंकाळा तलावावर विद्युत खांब व दिव्याचे अज्ञात व्यक्ती अथवा वाहनाकडून जे नुकसान झाले होते. त्याविरूद्ध आवाज उठवून प्रशासनाने गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली होती, याची दखल घेऊन अखेर महापालिकेच्या वतीने जुना राजवाडा पोलीस स्थानकात अज्ञात व्यक्ती विरूद्ध गु.र.५५२/२०२४ बी.एन.एस.३२४ (४) प्रमाणे फिर्यादी अमित अरूण दळवी

 

कनिष्ठ अभियंता यांनी रंकाळा तलाव येथे डेकोरेटीव्ह विद्युत खांबाचे अज्ञात वाहनाने धडक देऊन अंदाजे ४०,०००/- रूपयांचे नुकसान केलेचे अदखलपात्र गुन्हा दाखल केला असून सहाय्यक फौजदार आमते तपास करीत आहेत. तरी पोलीस प्रशासनाने परिसरातील सी. सी. टीव्ही तपासून त्वरीत कठोर कारवाई करावी अशी मागणी कोल्हापूर शहर सुधारणा समितीच्या वतीने केली आहे .