कोल्हापूर : प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) २.० अंतर्गत नविन घरकुल मंजूरीकरीता महापालिका हद्दीतील इच्छूक लाभार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी सुरु करण्यात आली आहे. सदरची नोंदणी https://pmaymis.gov.in/PMAYMIS2_2024/PmayDefault.aspx या वेबपोर्टलवर करता येणार आहे. या नोंदणीसाठी संबंधीत लाभार्थ्याचे देशामध्ये तसेच कुटूंबामधील इतर सदस्यांच्या नावे पक्के घर नसावे. लाभार्थ्यांने गेल्या २० वर्षात कोणत्याही घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा. वार्षिक उत्पन्न कमाल मर्यादा ३.०० लक्ष रुपये असावी अशी पात्रता आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे आधार कार्ड (मोबाईल नंबरशी लिंक असणे आवश्यक), उत्पन्नाचे चालु वर्षाचे प्रमाणपत्र (तहसीलदार यांचे), पॅन कार्ड, जात प्रमाणपत्र, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक (आधार लिंक असलेले), मालमत्ता पत्रक, बांधकाम परवाना किंवा बांधकाम परवानगीकरिता जमा केलेला पुरावा आवश्यक, अर्जदार यांचे आई व वडिलांचे आधारकार्ड (हयात नसल्यास मृत्यू प्रमाणपत्र), अर्जदार यांचे कुटूंबामधील सर्व सदस्यांचे आधार कार्ड (पती/पत्नी व अविवाहित मुले), पी.एम.स्वनिधी, इमारत बांधकाम कामगार, पी.एम विश्वकर्मा इ. योजनेचा लाभ घेतलेला असल्यास नोंदणी प्रत इत्यादी कागदपत्रांची आवश्यक आहे.
प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) 2.0 मध्ये लाभासाठी ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी नागरिकांनी तपशील काळजीपूर्वक वाचवा आणि समजून घ्यावा. एकदा घटक निवडल्यानंतर, तो बदलला जाऊ शकत नाही. कोल्हापूर महानगरपालिका प्रधानमंत्री आवास योजना कक्षाद्वारे पात्रता पडताळनी केल्याशिवाय प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) 2.0 योजनेचा लाभ मिळण्यासाठी नागरिक पात्र होणार नाहीत. त्यामुळे Online अर्ज केल्यानंतर अर्जाच्या प्रिंट सह आवश्यक कागदपत्रे प्रधानमंत्री आवास योजनेच्या कार्यालयात जमा करणे अनिवार्य राहील. संपूर्ण कागदपत्राच्या मुळ प्रतीसह ऑनलाईन नोंदणी करुन या योजनेमध्ये लाभ घेण्यासाठी सदरचे पोर्टवर किंवा छत्रपती शिवाजी मार्केट, ३ रा मजला येथील ‘प्रधानमंत्री आवास योजना कक्ष येथे आवश्यक कागदपत्रांसह संपर्क साधण्याचे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.