संभाजीराजे छत्रपतींनी घेतली सी. पी. राधाकृष्णन यांची भेट

मुंबई : संभाजीराजे छत्रपती यांनी सर्वपक्षीय शिष्टमंडळाच्या वतीने महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेतली. बीड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था आणि नागरीकांच्या सुरक्षिततेसंदर्भात चर्चा करत निवेदन सादर करण्यात आले. यामध्ये प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे करण्यात आल्या.

 

■ धनंजय मुंडे यांचा राजीनामा : संतोष देशमुख हत्या प्रकरणात हस्तक्षेप होण्याची शक्यता लक्षात घेऊन मंत्री पदाचा तातडीने राजीनामा घ्यावा.

■ वाल्मीक कराड याच्यावर कठोर कारवाई : खंडणी, अपहरण आणि खुनाच्या प्रकरणात वाल्मीक कराड यांच्यावर तातडीने खटला दाखल करून न्यायालयीन प्रक्रिया सुरू करावी.

■ पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई : कर्तव्यात निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करून कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी. महाराष्ट्र शासनाने नेमलेल्या एस. आय. टी. मधून धनंजय मुंडे व वाल्मिक कराड यांच्या संबंधित अधिकाऱ्यांना वगळण्यात यावे.

■ नागरिकांचा विश्वास पुन्हा प्रस्थापित करणे : खंडणी व गुंडगिरीला आळा घालण्यासाठी ठोस उपाययोजना करून बीडमधील नागरिकांना सुरक्षितता प्रदान करावी.

यावेळी शिष्टमंडळामध्ये खा. बजरंग सोनवणे मा.आम. अंबादास दानवे, मा.आम. विजय वडेट्टीवार, मा.आम.संदिप शिरसागर, मा.आम.सुरेश धस, शिवसंग्राम संघटनेच्या ज्योतीताई मेटे, स्वराज्य पक्षाचे सरचिटणीस धनंजय जाधव, स्वराज्य पक्ष उपाध्यक्ष अंकुश कदम आदी उपस्थित होते.

🤙 8080365706