मुंबई: जगभरात थैमान घातलेल्या कोरोना महामारीनंतर चीन आणखी एका धोकादायक व्हायरसच्या विळख्यात सापडला आहे. चीनमध्ये ह्यूमन मेटाज्यूमोव्हायरसमुळे (HMPV) हाहाकार उडाला आहे. या व्हायरसमुळे नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. अशात चीनमधील हा व्हायरस भारतातही पोहोचला आहे.
या व्हायरसचा पहिला रुग्ण बंगळुरूमध्ये आढळला आहे. बंगळुरू येथील एका रुग्णालयात आठ महिन्यांच्या मुलीमध्ये HMPV व्हायरस आढळून आला आहे.
HMPV काय आहे?
एचएमपीव्ही व्हायरस गेल्या अनेक दशकांपासून आहे. यूएस सेंटर फॉर डिजिज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शननुसार, 2001मध्ये पहिल्यांदा नेदरलँडमध्ये हा व्हायरस आढळला. श्वसनाचा त्रास असलेल्या मुलांच्या सँपलमधून या आजाराची माहिती मिळाली. हा व्हायरस सर्व ऋतूत असतो. संसर्ग झालेल्या लोकांच्या खोकण्यातून किंवा शिंकण्यातून हा व्हायरस पसरतो. हिवाळ्यात हा आजार अधिक फैलावतो. 1958 मध्ये हा व्हायरस मोठ्या प्रमाणावर फैलावला होता, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
HMPV व्हायरसचे लक्षण
कोरोना सारखे लक्षण
ताप आणि खोकला
श्वास घ्यायला त्रास
फुफ्फुसात संक्रमण
नाक बंद होणं
गळ्यात घरघर होणं
संसर्गजन्य रोग, संपर्कात आल्याने फैलावतो