न्यू कॉलेज पटांगणातील नशीला अड्डा, ओपन बार बंद करा..

कोल्हापूर : दररोज रात्री साडेआठ नंतर न्यू कॉलेज प्रीमायसेस मध्ये अनेक युवक रात्री मध्य प्राशन करत बसलेले असतात, सिगारेट ओढत बसलेले असतात, आजची परिस्थिती बघितली तर दारू पिऊन स्वतःच्या शरीराची नासाडी करून घेणे, नशेच्या भरात गुन्हेगारीची कृत्य करणे, असे प्रकार तरुणांच्या माध्यमातून होऊन तरुणाई भरकटत चालली आहे.कॉलेज म्हणजे जणू नशीला अड्डा बनला आहे.

एकीकडे तुम्ही विद्यार्थ्यांना घडवता.. आणि संध्याकाळी त्याच विद्यार्थी यांना बिघडवण्यासाठी कारणीभूत ठरता. असा आमचा आरोप आहे..कॉलेजची सुरक्षा यंत्रणा,किंवा गार्ड हे काय करतात? येणाऱ्या काळात जर असेच जर चालू राहिले
तर कॉलेज विद्यार्थी हे बिघडणारच आहेतच , याबरोबर या परिसरात जर मोठा गुन्हा घडला,तर या गुन्ह्याला देखील कॉलेज प्रशासन खतपाणी घालता हे सिद्ध होईल…अशा मागणीचे निवेदन युवा सेनेच्या वतीने देण्यात आले. ज्या ज्या कॉलेज च्या बाहेर नशिले अड्डे आहेत त्यांना येणाऱ्या दोन दिवसात रात्री कोणीही तरुण दारू पिताना किंवा नशा करताना आढळला,तर आम्ही शिवसेना स्टाईलने पोलीस प्रशासनाला हाताशी धरून हा नशीला अड्डा उध्वस्त करू तसेच याच्याकडे दुर्लक्ष करणारे आपण सर्व न्यू कॉलेजचे अधिकारी यांच्यावर देखील गुन्हे दाखल करण्यासाठी उग्र आंदोलन करू या पद्धतीची मागणी युवासेनेच्या पदाधिकारी यांनी केली..
यावर प्राचार्य व्ही, एम पाटील यांनी उद्यापासूनच पोलीस बंदोबस्त करून, असे करणार्यानवर गुन्हे दाखल करू असे आश्वासन दिले..
यावेळी उपस्थित युवासेना जिल्हा प्रमुख मंजित माने, शहर चिटणीस अक्षय घाटगे, उपजिल्हा युवाअधिकारी सदाशिव पवार, उपशहर प्रमुख किर्तीकुमार जाधव, अभि दाबाडे, शुभम पाटील, सिद्धेश नाईक, श्रीनंद वडर,लतीफ शेक,युवतीसेना शहर प्रमुख सानिका दामूगाडे, समन्व्यक माधुरी जाधव, प्रिया माने, समृद्धी गुरव विभाग अधिकारी अक्षय मोरे, संकेत गुरव, आदित्य जाधव,ओंकार मंडलिक, यशराज रसाळ, गणेश भोसले आदी..

🤙 9921334545