कोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील तेरा गावांसह हातकणंगले तालुक्यातील सहा गावांमधील कोरडवाहू शेतजमिनी सिंचनाखाली आणण्यासंदर्भात आराखडा बनवण्यासाठी पाटबंधारे विभागाच्या कोल्हापूर मंडल कार्यालयात अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली.
दिंडनेर्ली उपसा सिंचन योजनेअंतर्गत दिंडनेर्ली, हणबरवाडी, वडगाव, वड्डवाडी, गिरगाव,कोगील बु., कोगील खुर्द,कणेरी, पाचगांव, कळंबे, नंदवाळ, जैताळ व कंदलगांव अशा 13 गावांचा समावेश असून अंदाजे 5380 हे. सिंचन क्षेत्रास लाभ होणार आहे. या क्षेत्राला दूधगंगा प्रकल्पाअंतर्गत दूधगंगा नदी मधून उपसा सिंचन योजना करण्याबाबत चर्चा झाली. याबाबत शासन स्तरावर लवकरच बैठक आयोजित करण्याचा निर्णय झाला.
त्याचबरोबर हातकणंगले तालुक्यातील मौ. आळते, मजले, तमदलगे, निमशिरगांव, माळेवाडी व रामलिंग परिसर या भागातील पाण्यापासून वंचित क्षेत्रास वारणा / पंचगंगा नदीमधून पाणी कसे उपलब्ध करुन देता येईल याबाबत सर्व्हेक्षण करुन विविध पर्यायांचा अभ्यास करणेबाबत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
कोल्हापूर जिल्यातील पाण्यापासून वंचित / कोरडवाहू क्षेत्रास सिंचनाचा लाभ देण्याच्या दृष्टीने काही नाविण्यपूर्ण योजना राबविता येतील का याबाबत अभ्यास करण्याच्या सूचना दिल्या.
या बैठकीला पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता अभिजित म्हेत्रे, उपअधीक्षक अभियंता संजय पाटील, कार्यकारी अभियंता अशोक पवार,स्मिता माने,
उप कार्यकारी अभियंता शरद पाटील यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.