एम.जी. शहा विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज, बाहुबली येथे आजी-आजोबा विनय दिन कार्यक्रम 

कुंभोज  (विनोद शिंगे)

एम.जी. शहा विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज, बाहुबली येथे १ जानेवारी रोजी आजी-आजोबा विनय दिन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

 

 

 

या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशालेचे मुख्याध्यापक गोमटेश बेडगे हे होते. प्रमुख पाहुणे बाळासाहेब पाटील, सेवानिवृत्त अध्यापक,हिंगणगाव व शंकर शिंदे विद्यमान उपसरपंच बुवाचे वठार हे उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात आजी-आजोबाचे वाद्यवृंदांच्या गजरामध्ये स्वागत करण्यात आले.
त्यानंतर मंगलाचरण व स्वागत गीत विद्यार्थिनी सादर केला. प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन संपन्न झाले. उपस्थित मान्यवरांचे स्वागत प्रशालाचे उपमुख्याध्यापक अनिल हिंगलजे यांनी केले प्रास्ताविकामध्ये त्यांनी आजी-आजोबा विनय दिन का साजरा केला जातो हे विद्यार्थ्यांना सांगितले.

त्यानंतर उपस्थित आजी-आजोबांचे इ.८ वीच्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी आपल्या आजी-आजोबाचे पादपूजन संपन्न झाले. तसेच विनयगीत इ. ८ वीच्या विद्यार्थिनींनी सादर केले. विद्यार्थी मनोगतामध्ये पिया धाडवे हिने आजी-आजोबांच्या विषयी माहिती सांगितली व एक स्व-रचित कविता सादर केली.त्यानंतर अध्यापक मनोगतामध्ये सुदर्शन चौगुले यांनी आजी-आजोबा हे नातवंडासाठी संस्काराचे विद्यापीठ असतात असे सांगितले व त्यानंतर आजी-आजोबा यावर एक कविता सादर केली.

प्रमुख पाहुणे बाळासाहेब पाटील यांनी आजी-आजोबांचे महत्त्व सांगितले तसेच शंकर शिंदे विद्यमान उपसरपंच बुवाचे वठार यांनीदेखील या उपक्रमाचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या. अध्यक्षीय मनोगतामध्ये प्रशालेचे मुख्याध्यापक गोमटेश बेडगे यांनी नातवांचे आजी-आजोबांना पत्र वाचन करून दाखवले. तसेच आजी आजोबांचे संस्कार नातवंडावर होत असतात हे सांगितले. त्यानंतर इ. ८ वीच्या विद्यार्थिनींनी एक भावस्पर्शी नाटिका सादर केली. उपस्थितीतील विमल वळवडे आजीने वय वर्षे ९८ शाळेला देणगी व शुभेच्छा दिल्या. बाहुबली वर आधारित एक गीत म्हणून दाखविले. या कार्यक्रमासाठी प्रशालेचे पर्यवेक्षक नेमिनाथ बाळीकाई,तांत्रिक विभाग प्रमुख रवींद्र देसाई,व्यवसाय विभाग प्रमुख अरुण चौगुले, प्रशालेचे सर्व अध्यापक-अध्यापिका, विद्यार्थी-विद्यार्थिनी व तुमची आजी-आजोबा उपस्थित होते. आभार निता पाटील यांनी केले. सूत्रसंचालन संचिता मगदूम, श्रावणी देवमोरे व वैशाली लठ्ठे यांनी केले.