कुंभोज (विनोद शिंगे)
श्री जैन श्वेतांबर तेरापंथी सभा यांच्या वतीने श्री तेरापंथी भवन, कागवाडे मळा, इचलकरंजी येथे नववर्षानिमित्त भव्य महामंगलिक आध्यात्मिक अनुष्ठान कार्यक्रम आयोजित करण्यात आला.


या कार्यक्रमात युगप्रधान शांतिदूत आचार्य श्री महाश्रमणजी यांचे शिष्य डॉ. मुनिश्री पुलकित कुमारजी आणि आदित्य कुमारजी* यांच्या प्रेरणादायी उपस्थितीत भाविकांना अध्यात्माचा गूढ संदेश आणि शांततेचा मंत्र मिळाला.
या मंगल प्रसंगी आमदार डॉ. राहुल प्रकाश आवाडे यांनी आपली उपस्थिती लावून मुनिश्रींचे दर्शन घेतले आणि त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेतला. या सोहळ्यात त्यांनी आपल्या भाषणातून समाजाला अध्यात्म, शांती, आणि नैतिकता यांचे महत्त्व समजावून दिले.
कार्यक्रमास तेरापंथी सभा पदाधिकारी, स्थानिक जैन समाज, तसेच श्रावक-श्राविका मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. या भव्य सोहळ्याने संपूर्ण परिसरात आध्यात्मिक उत्साह निर्माण केला.
