खेड येथील अल्पवयीन मुलींवरील अमानुष घटनेविरोधात जनआक्रोश मोर्चा

कुंभोज (विनोद शिंगे)
खेड येथे घडलेल्या हृदयद्रावक घटनेत दोन सख्ख्या अल्पवयीन बहिणींवर अमानुष अत्याचार करून त्यांना जीवे मारणाऱ्या नराधमाच्या क्रूर कृत्याने संपूर्ण समाज हादरला आहे. या दुर्दैवी घटनेत एका चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्यानंतर त्या दोघींना निर्दयपणे ठार मारण्यात आले. मात्र, पोलीस प्रशासनाने वेगवान कारवाई करत या नराधमाला अवघ्या चार तासांत अटक केली.

 

 

 

 

 

 

या घटनेविरोधात आणि आरोपीस फाशीची कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी इचलकरंजी व परिसर गोसावी समाज विकास मंच यांच्या वतीने जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले.

या मोर्चामध्ये आमदार डॉ. राहुल प्रकाश आवाडे यांनी सक्रिय सहभाग नोंदवला*. त्यांनी प्रांताधिकारी मौसमी बेर्डे-चौगुले यांना निवेदन सादर केले, ज्यामध्ये या घटनेतील नराधमाला फाशीची शिक्षा देऊन समाजात कठोर संदेश देण्याची मागणी केली.

आमदार डॉ. राहुल प्रकाश आवाडे यांनी आपल्या भाषणातून या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला आणि असे प्रकार थांबवण्यासाठी समाज, प्रशासन, आणि कायदा-सुव्यवस्थेने कठोर पावले उचलण्याचे आवाहन केले. त्यांनी असेही म्हटले की, “या प्रकारांमुळे समाजमन अस्थिर होते, त्यामुळे अशा घटनांना रोखण्यासाठी कडक उपाययोजना करण्याची गरज आहे.”

मोर्चात गोसावी समाजातील नागरिक, विविध संघटनांचे नेते, स्थानिक समाजबांधव, तसेच मान्यवरांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. सर्वांनी एकत्र येऊन पीडित कुटुंबाला सहानुभूती आणि समर्थन व्यक्त केले.

🤙 8080365706