साडेआठ कोटींपेक्षा अधिक नागरिकांचे कुष्ठरोग शोध अभियान अंतर्गत होणार सर्वेक्षण

पुणे – सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत #कुष्ठरोग निर्मूलनासाठी ३१ जानेवारी ते १४ फेब्रुवारी या कालावधीत प्रत्यक्ष घरोघर जाऊन #कुष्ठरोग_शोध_अभियान राबविण्यात येणार असून, ग्रामीण व निवडक शहरी भागातील सुमारे ८,६६,२५,२३० नागरिकांचे #सर्वेक्षण या कालावधीत करण्याचे उद्दिष्ट आरोग्य विभागाने ठेवले आहे. कुष्ठरोग शोध अभियान लोकसहभागाद्वारे यशस्वी करावे, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागाची कुष्ठरोग शोध अभियानासाठीची राज्य माध्यम जनजागृती समितीची बैठक सोमवारी दृकश्राव्य माध्यमाद्वारे पार पडली. राज्याच्या आरोग्य विभागाचे आरोग्य सेवा आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे व्यवस्थापकीय संचालक अमगोथु श्री रंगा नायक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या बैठकीला डॉ. नितीन अंबाडेकर, संचालक, मुंबई, डॉ. संदीप सांगळे, सहसंचालक, राज्य क्षयरोग व कुष्ठरोग, डॉ. कैलास बाविस्कर, उपसंचालक, राज्य आरोग्य शिक्षण व संपर्क विभाग, डॉ. रामजी अडकेकर, सहाय्यक संचालक, कुष्ठरोग, डॉ. संजयकुमार जठार, सहाय्यक संचालक, राज्य आरोग्य शिक्षण व संपर्क विभाग, डॉ. दिगंबर कानगुले, सहाय्यक संचालक, डॉ. नितीन भालेराव, सहाय्यक संचालक, बॉम्बे लेप्रसी प्रोजेक्टचे संचालक डॉ. विवेक पै, अलर्ट इंडियाचे मुख्य कार्यकारी डॉ. अॅन्टोनी सामी, आकाशवाणी कार्यक्रम अधिकारी अतुल पहाडी तसेच विभागाचे अधिकारी बैठकीला उपस्थित होते.

राज्यातील सर्व ग्रामीण व निवडक शहरी भागात तसेच ज्या जिल्ह्यात कुष्ठरोग सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यासाठी ७०,७६८ शोध पथके तयार कऱण्यात येणार असून, १ कोटी ७३ लाख घरांना भेटी देऊन कुष्ठरोग व क्षयरोगाचे सर्वेक्षण केले जाणार आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त दि. ३० जानेवारी हा कुष्ठरोग निवारण दिन साजरा करण्यात येतो आणि या दिवशी कुष्ठरोग मुक्त महाराष्ट्रासाठी शपथ देण्यात येणार आहे. या निमित्ताने दि. ३१ जानेवारी ते १४ फेब्रुवारी दरम्यान कुष्ठरोग आणि त्याचबरोबर #क्षयरोग_जनजागृती_अभियान राबविण्यात येणार आहे. #जनजागृती व लोकसहभागासाठी राज्यभर विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

कुष्ठरोगाविषयी व्यापक #लोकजागृती करण्यासाठी दि. २६ जानेवारी रोजी राज्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसभा घेण्यात येणार आहेत. या ग्रामसभेमध्ये सरपंच, गावातील प्रतिष्ठित व्यक्ती व कुष्ठबाधित व्यक्ती यांच्या उपस्थितीत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून कुष्ठरोगाविषयी जनसामान्यांपर्यंत संदेश पोहचविण्यात येणार आहेत.

 

 

🤙 9921334545