कोल्हापूर : 31 डिसेंबर नूतन वर्षाच्या पार्श्वभूमीच्या अनुषंगाने करण्यात येणार्या कारवाईची माहिती राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर मधून अधीक्षक श्रीमती स्नेहलता श्रीकर-नरवणे यांनी दिली.
यामध्ये प्रामुख्याने तपासणी नाके कार्यरत करण्यात आलेले असून अधिकारी कर्मचारी यांची 24×7 नियुक्ती करण्यात आलेली आहे.
त्यामध्ये कायमस्वरूपी तपासणी नाक्यांमध्ये
१.एकात्मिक सीमा तपासणी नाका कागल २. शिनोळी तालुका चंदगड तपासणी नाका.
आणि तात्पुरते तपासणी नाके त्यामध्ये फोंडा तालुका राधानगरी, गगनबावडा चेक पोस्ट, आंबा घाट ,अनुस्कुरा घाट ,तिलारी घाट कार्यरत करण्यात आले आहेत.
तसेच विशेष भरारी पथक यामध्ये नऊ विशेष भरारी पथकांची नियुक्ती करून दैनंदिनरीत्या रात्रगस्तीचे नियोजन करून संशयास्पद बंद असलेली गोडाऊन, पोल्ट्री फार्म ,बंद असलेल्या बिल्डिंग ,रिकाम्या इमारती,धाबे,खानावळी, चहाच्या टपऱ्या यांचे तपासणी करून अवैध्य मद्याची विक्री होणार नाही याची दक्षता घेण्यात येणार आहे. दररोज संशयीत ठिकाणी छापे घालण्यात येत आहेत व काही आक्षेपार्ह आढळल्यास तात्काळ गुन्हे नोंद करण्यात येत आहेत.
तसेच संयुक्त मोहिमा काढण्यात आले आहे ज्यामध्ये सदर कालावधीत ज्या-ज्या ठिकाणी इतर विभागांची जसे पोलीस विभाग, वन विभाग इत्यादींची मदत लागेल त्यानुसार यथास्थिती घेऊन संयुक्त मोहिमेद्वारे संबंधित अवैध धंदे नेस्तनाभूत करण्याची दक्षता घेण्याबाबत कार्यक्षेत्रे अधिकारी यांना सूचित करण्यात आलेले आहे अशी माहिती अधीक्षकांनी दिली.
राज्य उत्पादन शुल्काचा वर्षभराचा आढावा घेताना अधीक्षक श्रीमती स्नेहलता श्रीकर यांनी एक जानेवारी ते 29 डिसेंबर रोजी पर्यंत 2155 केसेस दाखल करण्यात आल्या असून 2066 आरोपी अटक झाल्याचे सांगितले. त्यामध्ये 147 वाहने व 5 कोटीचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती दिली.
तसेच 1 डिसेंबर ते 29 डिसेंबर दरम्यान जवळपास 65 केसेस दाखल झाल्या असून 170 आरोपी अटक झाले आहेत आणि 37 वाहने व 65. 25 लाख मुद्देमान जप्त झाल्याची माहिती अधीक्षीका श्रीमती स्नेहलता श्रीकर-नरवणे यांनी दिली.