आ. राहुल आवाडेंच्या उपस्थितीत रेणुका माता भव्य कलश यात्रेचा शुभारंभ

कुंभोज (विनोद शिंगे)
आमदार राहुल आवाडे यांच्या उपस्थितीत श्री रेणुका माता पदुकापूजन व रथयात्रा निमित्त भव्य कलश यात्रेचा शुभारंभ शिवतीर्थ, इचलकरंजी येथून करण्यात आला.

 

ही यात्रेची शोभायात्रा थोरात चौक, इचलकरंजी येथे समारोपास पोहोचली. या पवित्र आणि उत्साहपूर्ण रथयात्रेत माजी मंत्री मा.आमदार प्रकाश आवाडे व आमदार डॉ. राहुल प्रकाश आवाडे यांनी सहभाग घेतला व रेणुका मातेच्या पवित्र दर्शनाचा लाभ घेतला. या मंगलम सोहळ्याने परिसरात धार्मिक उत्साहाचे वातावरण निर्माण केले.

🤙 9921334545