कोल्हापूर : १९७४ साली वस्त्रनगरीत संपन्न झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या सुवर्णमहोत्सवी स्मृतिजागर सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले. संमेलनाच्या ५० वर्षपूर्तीनिमित्त या ऐतिहासिक कार्यक्रमाला मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटन स्वागताध्यक्ष माजी आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे आमदार राहुल आवाडे यांच्या समवेत डॉ. सुनीलकुमार लवटे, अपर्णा वाईकर आणि निमंत्रक दिलीप शेंडे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात गोविंदराव हायस्कूल प्रांगणातून भव्य ग्रंथदिंडीतून झाली, जी राजवाड्यात स्मृतिजागराच्या मुख्य सोहळ्यात रूपांतरित झाली. हा सोहळा मराठी साहित्यप्रेमींसाठी एक संस्मरणीय पर्व ठरला.