सांगली: ग्राम कैफियत बैठकीच्या माध्यमातून आमदार सदाभाऊ खोत सांगलीच्या वाळवा तालुक्यातील जनतेशी संपर्क साधत इस्लामपूर वाळवा तालुक्यातील सर्व विभागाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांसमवेत माजी राज्यमंत्री तथा आमदार सदाभाऊ खोत यांच्या अध्यक्षतेखाली आज सकाळी ११.०० वाजता बचतधाम सभागृह, पंचायत समिती, इस्लामपूर येथे ग्राम कैफियत बैठक झाली.
यावेळी नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर तात्काळ उपयोजना करून त्याचे निराकरण करण्याचे आदेश आमदार सदाभाऊ खोत यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
यावेळी प्रांत अधिकारी इस्लामपूर तहसीलदार इस्लामपूर, बिडिओ सर्कल, तलाठी आरोग्य विभागातील अधिकारी, शिराळा तहसीलदार, एम एस सी बी चे सर्व अधिकारी बांधकाम विभागाचे सर्व अधिकारी व वाळवा तालुक्यातील नागरिक उपस्थित होते.