पंकजा मुंडेंनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पशुसंवर्धन विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांची घेतली बैठक

कोल्हापूर : पर्यावरण आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांनी शासकीय विश्राम धाम येथे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पशुसंवर्धन विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांची बैठक घेतली.

 

 

पंचगंगा नदी प्रदूषणाला आळा घालण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबवण्यासाठी आराखडा बनवावा तसेच यासंदर्भात उद्योजक, महापालिका आणि जिल्हा परिषद अधिकारी, साखर कारखानदार पर्यावरण तज्ञ यांची व्यापक बैठक बोलवावी अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या.
कोल्हापूर जिल्ह्यातील रिक्त पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे भरण्यासंदर्भात पशु संवर्धन अधिकाऱ्यांनी प्रस्ताव सादर करावा असे निर्देशही त्यांनी दिले.