भाजपा सदस्यता नोंदणी अभियानाची रूपरेषा ठरवण्यासाठी भाजपा कार्यालयात कार्यशाळा

कोल्हापूर :भाजपा सदस्यता नोंदणी अभियानाची रूपरेषा ठरवण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या नागाळा पार्क येथील कार्यालयात कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार राहुल आवाडे उपस्थित होते.

 

जास्तीत जास्त लोक भारतीय जनता पार्टीसोबत जोडले जावेत यासाठी सर्वांनी सदस्यता नोंदणी अभियान प्रभावीपणे राबवण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
यावेळी भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव, महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव, कोल्हापूर पूर्वचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजवर्धन निंबाळकर यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेला जन्मशताब्दी निमित्त पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.