विजेच्या धक्क्याने तीन म्हशींचा मृत्यू ; व्हनाळीतील घटना

कोल्हापूर: व्हनाळी(ता.कागल) येथे महावितरणची विद्युत तार तुटून ओढ्याच्या पाण्यात पडल्याने विजेचा धक्का लागून बहादुर गोपाळ वाडकर यांच्या तीन म्हशींचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये सुमारे पाच लाखाचे नुकसान झाले आहे.

 

बहादुर वाडकर यांच्या गुऱ्हाळ घराजवळील चिमट्याचा ओढा येथे आज (बुधवार) सकाळी सात वाजता बहादुर वाडकर हे जनावरांच्या धारा काढून ओढ्यावर पाणी पाजून धुण्यासाठी केले होते. त्यावेळी म्हशी पाण्यात गेल्यानंतर त्यांना विजेचा जोराचा धक्का बसला. यामध्ये वाडकर यांना सुद्धा विजेचा सौम्य धक्का बसला.

यावेळी आजूबाजूच्या लोकांनी वायरमनला कळवून वीज प्रवाह बंद केला. तोपर्यंत म्हशीचा मृत्यु झाला होता. तलाठी अमित लाटे यांनी घटनेचा पंचनामा केला.