मुंबई : महाराष्ट्रातील बेघरांसाठी पंतप्रधान आवास योजनेतून 6लाख 36 हजार 89 घरी उपलब्ध करून दिली आहे. यातील काहींना निकषामुळे घर मिळत नव्हते. त्यामुळे पात्रतेचे निकष शिथिल केले असून,यावर्षी महाराष्ट्रासाठी 13 लाख 29 हजार 678 घरी अशी एकूण सुमारे 20 लाख घरी उपलब्ध करून दिली जाणार आहेत. अशी घोषणा केंद्रीय कृषि व ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केली.
पुण्यातील कृषी तंत्रज्ञान अनुप्रयोग तंत्रज्ञान संस्थेतर्फे शेतकरी सन्मान दिनानिमित्त आयोजित संमेलनात ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील,ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ ढवळे, डॉक्टर पंजाबराव देशमुख,कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.शरद गडाख, संस्थेचे संचालक एस. के.रॉय उपस्थित होते.
पूर्वी फोन व दुचाकी असलेल्यांना घर मिळत नव्हते आता अशांना घर मिळतील .ज्या कुटुंबाचे मासिक उत्पन्न 10,000 असायचे यांचाही योजनेत समावेश केला जात नव्हता. आता ही मर्यादा पंधरा हजार रुपये प्रति महिना केली आहे .पाच एकर कोरडवाहू व अडीच एकर बागायती शेती असलेल्या शेतकऱ्यांना ही योजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे चौहान यांनी सांगितले.