मुंबई: शिवसेना ‘उबाठा’गटाचे नेते भास्कर जाधव यांनी सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले, निवडणुका जिंकण्यासाठी लोकप्रिय योजना लागू करायच्या आणि निवडणूक होताच वेगवेगळे कर लादून तेच पैसे जनतेकडून वसूल करायचे. याऐवजी राज्याला आर्थिक शिस्त लावायला हवी असे ते म्हणाले.
सरकारकडून होणाऱ्या आर्थिक शिस्तीच्या अभावावर आणि अनावश्यक खर्चावर भास्कर जाधव यांनी चिंता व्यक्त केली. प्रकल्प योजना यावरील खर्च कमी होता कामा नये. यासाठी आर्थिक शिस्तीची आवश्यकता आहे. पुरवणी मागणी या संदर्भात गोडबोले समितीच्या मार्गदर्शक तत्वानुसार पुरवणी मागणी या अर्थसंकल्पाच्या 10% पेक्षा अधिक असता कामा नये,परंतु सरकारने पुरवणी मागणीची मर्यादा ओलांडत 20 टक्क्यापर्यंत नेली आहे. यामुळे राज्याच्या तिजोरीवर भार पडणार आहे.
बिन खात्याचे मंत्री अधिवेशन काळात काम करत असल्याचा अनोखा विक्रम या सरकारने नोंदवला आहे. दोन उपमुख्यमंत्री सुधा बिनखात्याचे आहेत. फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संपूर्ण कारभार चालवत आहेत. सरकारमध्ये मोठ्या प्रमाणात बहुमत मिळाले की ते लोकशाहीला मारक असते.अशी टीका भास्कर जाधव यांनी केली.