शिरोली जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक ताकदीने लढवायची-शशिकांत खवरे

कुंभोज (विनोद शिंगे)
पुलाची शिरोली जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक ताकदीने लढवायची व जिंकायचीही असा निर्धार राष्ट्रीय काँग्रेस पुरस्कृत महाविकास आघाडी कार्यकर्ता मेळाव्यात व्यक्त करण्यात आला.

 

 

 

माजी सरपंच शशिकांत खवरे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा नुकताच पार पडला.यावेळी त्यांनी महविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आगामी निवडणुकीसाठी तयारीला लागावे असे आवाहन केले.
राष्ट्रीय काँग्रेस अनुसूचित जाती जमाती विभागाचे प्रदेश सचिव बाजीराव सातपुते अध्यक्षस्थानी होते.

खवरे म्हणाले, लोकसभा व विधानसभा निवडणुकीची समीकरणे वेगळी असतात.तरीही धनशक्तीच्या विरोधात शिरोलीतील मतदारांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना चांगले सहकार्य केले आहे.त्यामुळे आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीत परिवर्तन अटळ आहे.पण त्यासाठी काॅंग्रेस, शिवसेना (उबाठा) व राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गाफील न रहाता परिश्रम घेण्याचे आवाहनही खवरे यांनी केले.

बाजीराव सातपुते यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राष्ट्रीय काँग्रेस पक्ष व मिञ पक्षाच्या माध्यमातून मोठ्या ताकदीने लढवल्या जातील.त्याकरीता संघटनात्मक बांधणी करण्याच्या दृष्टीने पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले पाहिजेत असे आवाहन केले.

तालुका ओबीसी सेलचे अध्यक्ष व माजी ग्रा.पं.सदस्य सरदार मुल्ला म्हणाले, जि.प.व पं.स.निवडणूक कधीही जाहीर होवू शकते.त्यासाठी हातकणंगले तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते सज्ज असल्याचे सांगितले.
यावेळी उत्तम पाटील, राजू पाटील, संदीप कांबळे, ग्रा.पं.सदस्य महंमद महात,उबाठा युवा सेना अध्यक्ष मुकूंद नाळे, राहूल खवरे, रणजित कदम आदींनी मनोगत व्यक्त केले.
स्वागत सुरेश पाटील यांनी केले तर आभार उबाठाचे शहर उपाध्यक्ष सतिश रेडेकर यांनी मानले.

याप्रसंगी ग्रा.पं.सदस्य शक्ती यादव,माजी ग्रा.पं.सदस्य मुन्ना सनदे, राजू सुतार,कपील सावंत, प्रल्हाद खोत,रवि यादव, दिपक खवरे, तानाजी चव्हाण, केदार खवरे, मन्सूर नदाफ,अन्वर मुजावर, दिपक खवरे, आप्पासाहेब सावंत, बबन पोवार,युवक काॅंग्रेस शहर अध्यक्ष अतुल पाटील, अक्षय बावडेकर,बंडा माने,रवि पोवार,विजय पाटील, सुजित समुद्रे, अतुल शिंदे, राजू येसुगडे आदीसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो..
पुलाची शिरोलीत महाविकास आघाडीच्या मेळाव्यात बोलताना माजी सरपंच शशिकांत खवरे.