उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नागपूर येथील दीक्षाभूमीला दिली भेट

नागपूर : विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी नागपूर येथील दीक्षाभूमीला भेट देऊन भगवान गौतम बुद्धांना विनम्रतापूर्वक वंदन केले. तसेच भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला विनम्र अभिवादन केले.

 

दरवर्षी हिवाळी अधिवेशनादरम्यान आपण दीक्षाभूमीला आवर्जून भेट देतो. इथे येऊन एक वेगळीच ऊर्जा आणि अलौकिक समाधान लाभत असल्याचे मत यावेळी बोलताना व्यक्त केले.

यावेळी पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे, जयदीप कवाडे आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई गटाचे) राजेंद्र गवई तसेच शिवसेनेतील माझे सहकारी मंत्री उदय सामंत, शंभूराज देसाई, प्रताप सरनाईक, योगेश कदम, आमदार मुरजी पटेल, शिवसेना प्रवक्ते राहुल लोंढे यावेळी उपस्थित होते.

🤙 9921334545