विविध योजनांच्या पुरवणी मागण्यांना विधानसभेत मंजूरी

नागपूर : नागपूर हिवाळी अधिवेशनात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मुंबई-नागपूर द्रुतगती महामार्ग प्रकल्पासाठी राज्य रस्ते विकास महामंडळास भागभांडवल, राज्यातील रस्ते, पुल आणि अन्य पायाभूत सुविधांच्या विकासासाठी,

 

 

मुख्यमंत्री बळीराजा सवलत योजना, प्रधानमंत्री पीकविमा योजना, लघु व मध्यम उद्योगांना प्रोत्साहन योजना, दुध अनुदान योजना, केंद्र शासनाच्या अनुदानाने चालवलेल्या विकास योजनांसाठी राज्याचा हिस्सा, तसेच सार्वजनिक बांधकाम, कृषी, पदुम, उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाच्या २०२४-२५ वर्षाच्या पुरवणी मागण्यांना विधानसभेत मंजूरी देण्यात आली.

याप्रसंगी सभागृहाशी संबोधित करतांना, या पुरवणी मागण्यांवरील मुद्यांची शहानिशा करून त्यासंबंधी आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असे नमूद केले. सार्वजनिक बांधकाम विभागासाठी ७,४९० कोटी २४ लाख रुपये, कृषी व पदुम विभागासाठी २,१४७ कोटी ४१ लाख रुपये आणि उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागासाठी ४,११२ कोटी ७९ लाख रुपये या पुरवणी मागण्यांना मंजूरी देण्यात आली.