टाकाळा व उद्यमनगर येथील मोठया दोन थकबाकीधरकांकडून 6 लाख 69 हजार वसूल

कोल्हापूर :  महापालिकेच्या विभाग विभागीय कार्यालय क्रमांक 3 राजारामपुरी कडील करआकारणी व वसुली अंतर्गत टाकाळा व उद्यमनगरे येथे मालमत्ता कर थकीत रक्कमेच्या अनुषंगाने दोन व्यापा-यांकडून रुपये 6 लाख 69 हजार 940 वसूल करण्यात आले. यामध्ये टाकाळा येथील तुषार मोहनराव खटावकर यांचे दुकान गाळ्याचे थकीत रक्कमेपोटी दुकान सील करण्यासाठी वारंट बजावण्यात आले असता त्यांनी कराची संपूर्ण रक्कम रुपये 1,14,940/- भरली आहे.

 

 

 

त्याचबरोबर उद्यमनगर येथील राम फेब्रिकेटर्स यांचे कारखान्याचे थकीत रक्कमेपोटी कारखाना सील करण्यासाठी वारंट बजावण्यात आले असता त्यांनी कराची रक्कम रुपये 5,55,000/- इतकी भरली आहे. या कारवाईत आज थकीत रक्कम रुपये 6,69,940/- इतकी एका दिवसात वसूल करण्यात आली.

        शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर2024 रोजी उद्यमनगर, शाहूपुरी, राजारामपुरी येथे मिळकतीच्या थकीत मालमत्ता करापोटी मिळकतधारकांचे मिळकतीवर जप्ती व सील सारखी कारवाई करून थकीत रक्कम वसूल करण्यात येणार आहे. तरी संबंधीत थकबाकीधारकांची याची नोंद घेऊन आपला घरफाळा त्वरीत भरावा असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.