कोल्हापुरातील शिवम पाटील यांची इस्रोमध्ये शास्त्रज्ञ म्हणून निवड

कोल्हापूर : कोल्हापूर येथीलसाने गुरुजी वसाहत येथे राहणाऱ्या शिवम आनंदराव पाटील यांची इस्रोमध्ये शास्त्रज्ञ म्हणून निवड झाली आहे.

 

 

 

शिवम यांचे प्राथमिक शिक्षण साने गुरुजी परिसरातील सिद्धेश्वर प्रासादिक विद्यालयात झाले असून वसंतराव देशमुख हायस्कूल मधून त्यांनी माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. सांगलीच्या वालचंद महाविद्यालयातून त्यांनी बी.टेक हि पदवी संपादन केली. सध्या ते एका खासगी कंपनीत नोकरी करत असून त्यांनी इस्रो ची अभियंता पदासाठीची परीक्षा दिली. यात ते चांगल्या गुणांसह उत्तीर्ण झाले.झाले.