कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका कर आकारणी व वसुली (घरफाळा) विभागाच्या वतीने शहरातील मिळकत कर थकबाकीदारांना जप्ती नोटीस लागु करण्यात आल्या आहेत. यामधील ज्या मिळकतधारकांनी थकीत रक्कम जमा केली नाही अशा थकबाकीदारांवर कारवाई करुन मिळकती सिल करणेची कार्यवाही सुरु केली आहे. यामध्ये आज महाव्दार रोड येथील बालाजी भवन या व्यापारी संकुलातील 3 गाळेधारकांवर कारवाई करण्यात आली आहे.
हि कारवाई विभागीय कार्यालय क्र.1, गांधी मैदान येथील घरफाळा विभागाकडून करण्यात आली. यामध्ये करदाता क्रमांक 31161 दिलीप जोतीराव पाटील यांची रक्कम रु. 1 लाख 70 हजार 52 रुपये, करदाता क्रमांक 31158 दिलीप जोतीराव पाटील रक्कम यांची रु. 82 हजार 276 रुपये, करदाता क्रमांक 30931 दिलीप जोतीराव पाटील यांची रक्कम रु. 2 लाख 27 हजार 496 रुपये असे या तीन मिळकतींची एकूण रक्कम रु. 4 लाख 79 हजार 824 रुपये इतकी थकबाकी आहे. त्यामुळे हे तीन गाळे आज सील करण्यात आले आहेत.
तरी शहरातील सर्व थकबाकीदारांना पुन:श्च एकदा जाहीर आवाहन करण्यात येते की ज्यांनी अद्यापही आपल्या घरफाळ्याची थकीत रक्कम भरणा केलेली नाही त्यांनी आपला थकीत घरफाळा लवकरात लवकर भरुन महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे. अन्यथा महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतूदी नुसार सदरची मिळकत सील किंवा मिळकतीवर बोजा नोंद करण्याची कारवाई करण्यात येईल याची संबंधीतांनी नोंद घ्यावी.