नागपूर : नागपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आयोजित भव्य सत्कार सोहळा आणि पदाधिकारी मेळाव्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित राहून सर्वांना संबोधित केले. ते म्हणाले की, महाराष्ट्रातील जनतेने आपल्यावर मोठा विश्वास ठेवून विधानसभा निवडणुकीत निवडून दिले आहे.
त्या विश्वासाच्या आधारे आपली जबाबदारी आणखी वाढली आहे. आगामी काळात पक्षाच्या वृद्धीसाठी नागपूरमध्ये विदर्भ विभागीय कार्यालयाचे उद्घाटन झाले आहे, त्यामुळे पुन्हा जोमाने कामं सुरू ठेवण्याची आवश्यक आहे. आपण सर्वांनी हाती घेतलेले जनसेवेचे कार्य यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रत्येकाने पुढे येऊन काम करणे गरजेचे आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जनमानसांपर्यंत पोहोचवून, आपले उमेदवार निवडून देण्यासाठी काम करायचे आहे. या कार्यक्रमामध्ये उपस्थित सर्वांच्या शुभेच्छा स्वीकारून त्यांचे आभार मानले. याप्रसंगी पक्षाचे सर्व वरिष्ठ नेते, खासदार, नवनिर्वाचित आमदार, कार्यकर्ते तसेच पदाधिकारी उपस्थित होते.