महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव वचनबद्ध राहणार : आ. प्रकाश आबिटकर

कोल्हापूर : राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा सोहळा नागपूर येथील राजभवनात संपन्न झाला. महामहीम राज्यपाल .सी.पी.राधाकृष्णनजी यांच्या प्रमुख उपस्थितीत तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना मुख्यनेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मंत्री पदाची शपथ आमदार प्रकाश आबिटकर यांनी ग्रहण केली.

 

 

यावेळी आबीटकरांनी ,महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी महायुती सरकारच्या माध्यमातून सदैव वचनबद्ध राहण्याचा निर्धार केला. राधानगरी, भुदरगड व आजरा मतदारसंघातील जनतेसाठी आजचा हा ऐतिहासिक क्षण आहे.असे ते म्हणाले.