प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसैन यांचे निधन

मुंबई: प्रसिद्ध तबलावादक झाकीर हुसैन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन झाले.त्यांच्यावर अमेरिकेतील रुग्णालयात उपचार सुरू होते. झाकीर हुसैन यांना हृदयविकाराचा त्रास होता त्यांना अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अखेर त्यांची प्राणजोत मालवली.

 

 

मागील वर्षापासून झाकीर हुसैन यांना हृदयविकाराचा त्रास सुरू होता. त्यावरती उपचार सुद्धा घेत होते. मात्र त्यांची प्रकृती गंभीर बनल्याने त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाच्या बातमीने भारतीय संगीत विश्वावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

झाकीर हुसैन यांनी अनेक भारती आणि परदेशी चित्रपटांसाठी तबला वाजवला आहे. चार दशकापूर्वी झाकीर हुसैन हे संपूर्ण कुटुंबासह अमेरिकेत स्थायिक झाले. त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.

झाकीर हुसैन यांना भारत सरकारने 1988 मध्ये पद्मश्री, 2002 मध्ये पद्मभूषण ,2023 मध्ये पद्मविभूषण यासारख्या सर्वोच्च पुरस्काराने गौरविण्यात आले होते. 1990 मध्ये संगीत नाटक अकादमीचा सर्वोच्च संगीत पुरस्कारही त्यांना मिळाला होता. 2009 मध्ये 51 व्या ग्रॅमी पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं त्यांच्या कार्यकर्तेत सात वेळा ग्रॅमी पुरस्कारासाठी त्यांना नामांकन मिळालं होतं त्यापैकी त्यांना चार वेळा हा पुरस्कार मिळाला होता.