कोल्हापूर शहरातील विजेच्या खांबावरील बंद दिवे तत्काळ सुरु करावेत – भाजपा कोल्हापूरच्या वतीने अतिरिक्त आयुक्तांना निवेदन

कोल्हापूर :  भाजपा कोल्हापूरच्या वतीने आज शहरातील बंद दिव्यांच्या विषयी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांना निवेदन देण्यात आले. गेल्या अनेक दिवसांपासून शहरातील मुख्य रस्त्यांबरोबरच उपनगरांकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील विजेचे दिवे बंद आहेत. शहरामध्ये एकूण ३३,३७२ विजेचे खांब असून सध्या त्यातील २,५०० खांबावरील दिवे बंद अवस्थेत आहेत.

 

 

यातून होणारी नागरिकांची गैरसोय व रात्री अपरात्री होणारे अपघात, चोरी याचेप्रमाण वाढले असलेने याची गांभीर्याने दखल घेत भारतीय जनता पार्टीच्या वतीने शहानिशा केली असता महानगरपालिकेतील कारभार हा प्रशासक नियुक्ती पासून पूर्णतः अधांतरी असलेचे समजले.

त्याचबरोबर सर्व सामान्य नागरिकांना मुलभूत असणारे जन्म, मृत्यूचे दाखले देण्याबाबत महानगरपालिका प्रशासनाकडून फार विलंब केला जात आहे. अर्ज केल्यानंतर दोन-दोन महिने होऊन देखील दाखले उपलब्ध होत नाही आहेत. सन १९९६ पासूनच्या नोंदी महापालिकेकडे कॉम्पुटर रेकॉर्डला आहेत पण तरी देखील दाखले देण्यात विलंब का ? काही सालाचे रेकॉर्ड महानगरपालिका रेकॉर्ड विभागातून गहाळ झाले आहे याला जबाबदार कोण? तसेच जन्म, मृत्यू नोंद विभागामध्ये कॉम्पुटर, प्रिंटर, ऑपरेटर कमी प्रमाणात आहेत. काही कर्मचा-यांना अतिरिक्त चार्ज असल्यामुळे त्यांचे या विभागाकडे दुर्लक्ष होत आहे. सध्या सीपीआर रुग्णालयातून जन्म, मृत्यूचे प्रमाणपत्र आठ दिवसात देण्यात येत आहेत तरी देखील महापालिकेकडून दाखले देण्यासाठी विलंब का केला जात आहे. तरी वरील विषयासंदर्भात सर्व सामान्य नागरिकांची होत असलेली गैरसोय थांबवावी.

याचसंदर्भात आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांच्या अध्यक्षतेखाली अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी उपायुक्त श्रीमती साधना पाटील, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत हे उपस्थित होते. वरील दोन्ही विषयामध्ये नागरिकांना या दोन्ही मुलभूत सुविधा नागरिकांच्या सनदमध्ये नमूद केलेल्या वेळेतच मिळाव्या अन्यथा भाजपा कोल्हापूरच्या वतीने उग्र आंदोलन करण्यात येईल.

यावेळी जिल्हाध्यक्ष विजय जाधव म्हणाले, कोल्हापूर शहरातील असलेले विजेचे बरेच खांब अद्याप बंद अवस्थेत आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय होत आहे. महानगरपालिकेच्या वतीने EESL या कंपनीशी करार करून २०१९ ते २०२७ कालावधीमध्ये ३३,३७२ दिवे बसवण्यासाठी जो करार करण्यात आला होता त्यानुसार यामध्ये ठेकेदाराच्या विजेच्या दिव्यांची देखभाल करण्याच्या संदर्भात झालेले करार पाहता यामध्ये देखभालीचा खर्च व ठेकेदारास आज पर्यंतचे दिलेले बिल पाहता हे दिवे मुळात बंद का पडले असा प्रश्न निर्माण होतो. आजपर्यंत EESL या कंपनीला महापालिकेकडून १५ कोटी ५२ लाख ४३ हजार इतकी रक्कम देण्यात आली आहे. एक विजेचा दिवा खरेदी करण्यासाठी २५०० इतका खर्च येत असेल तर ३३,३७२ दिव्यांसाठी ८ कोटी ५० लाख इतका खर्च येतो पण तसे न होता महापालिका प्रशासनाकडून या ठेकेदारांना १५ कोटी ५२ लाख ४३ हजार इतकी रक्कम अदा करण्यात आली आहे मूळ रक्कमेपेक्षा आणखीन तसेच दिवे आणखी एकदा बसवले गेले असते इतकी रक्कम ठेकेदारांना देण्यात आली आहे. यामध्ये महापालिका अधिकाऱ्यांनी कोणाचे आर्थिक हित साधले आहे याचा खुलासा करावा.

यावेळी जिल्हाध्यक्ष विजय जाधव म्हणाले, जन्म मृत्यू नोंदणी दाखल्यासाठी केद्र शासना मार्फत तयार करण्यात आलेले CRS पोर्टल हे संगणकीय प्रणाली असून सदर CRS पोर्टलवर कोल्हापूर महानगरपालिकेचे नोडल युजर लॉगीन अकाउंट हे जन्म व मृत्यू विभागाकडे आहे त्यावर संगणक विभागाचे कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नाही असे दिसत आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना महापालिकेकडे हेलपाटे मारण्याची वेळ आली आहे तरी वरील सर्व विषयांबाबतीत तत्काळ निर्णय घेऊन नागरिकांची होणारी गैरसोय दूर करावी.

यावेळी लक्ष्मीपुरी मंडल अध्यक्ष विशाल शिराळकर म्हणाले, काही दाखल्यांचा नोंदी प्रमाणे जुने दाखले दिलेले आहेत पण सद्यस्थितीला महापालिकेकडे रेकॉर्ड नसल्याकारणाने तो दाखला अद्यावत आहेत याची मा. कोर्टाकडून परवानगी घ्यावी लागते. तर काही वेळेस अफीडेव्हीट सादर करावे लागते तरी या गैरसोयीस व खर्चास कोण जबाबदार असा प्रश्न नागरिकांना पडला आहे असे निदर्शनास आणून दिले.

याचबरोबर माजी नगरसेवक रुपाराणी निकम, उमा इंगळे, राजसिंह शेळके, जिल्हा उपाध्यक्ष अशोक देसाई, शैलेश पाटील, अमित पसारे यांनी त्यांच्या प्रभागातील समस्या निदर्शनास आणून दिल्या.

यावेळी प्र का सदस्य राहूल चिकोडे, जिल्हा सरचिटणीस डॉ सदानंद राजवर्धन, माधुरी नकाते, जिल्हा उपाध्यक्ष हेमंत आराध्ये, गणेश देसाई, रोहित पोवार, दिग्विजय कालेकर, अमर साठे, रविकिरण गवळी, सुधीर देसाई, गिरीष साळोखे, अनिल कामत, संतोष माळी, सयाजी आळवेकर, अशोक लोहार, दिलीप बोंद्रे, अवधूत भाटे, सुमित पारखे, योगेश साळोखे, उदय इंगळे, अॅड राणाप्रताप सासणे ई. पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.